मुंबई: यंदाच्या मे महिन्यात देशभरात मुसळधार पाऊस झाला असून, या पावसाने नवा उच्चांक गाठला आहे. मे महिन्यात विक्रमी १५९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, जी या महिन्याच्या सरासरीपेक्षा तब्बल ११ पट जास्त आहे. या अनपेक्षित पावसामुळे भर उन्हाळ्यातच अनेक भागांत नदी-नाल्यांना पूर आले, धरणांमधील जलसाठा वाढला आणि धबधबेही वाहू लागले.