
यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिलीय. जून ते सप्टेंबर या कालावधीत १०६ टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात चार टक्के कमी अधिक फरक पडू शकेल असंही हवामान विभागाने म्हटलंय. मान्सून कोअर झोन म्हणजेच पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असलेल्या भागात सरासरी पेक्षा जास्त १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.