
थोडक्यात
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात राहुल गांधी, अखिलेश यादव, महुआ मोईत्रा यांसह 300 हून अधिक खासदारांनी निवडणूक आयोगाविरुद्ध निषेध केला.
मोर्चादरम्यान अखिलेश यादव यांनी बॅरिकेडवरून उडी मारली, तर महुआ मोईत्रा आणि मिताली बाग या बेशुद्ध पडल्या.
अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेण्यात आले असून, काँग्रेसने मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचे आरोप केले.
निवडणूक आयोगाविरुद्ध निषेध करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिल्लीत 'मतचोरीच्या' कथित घटनेविरोधात मोठा मोर्चा काढला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चात ३०० हून अधिक विरोधी पक्ष खासदार सहभागी झाले यादरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष पोलिसांच्या बॅरिकेडवरून उडी मारली. दरम्यान राहुल गांधींसह खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले, यावेळी तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या बेशुद्ध पडल्या. त्यांच्या चेहऱ्यावर राहुल गांधींनी पाणी शिंपडल्यानंतर त्या शुद्धीवर आल्या.