देशाला मंगळवारपासून भासणार हजारो टन ऑक्सिजनची गरज

अवघ्या १५ दिवसांत चार हजार ८८० ते साडेसहा हजार टनांची गरज
oxygen cylinder
oxygen cylinderesakal

नवी दिल्ली : महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांत कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर शुक्रवारी (ता. १६) जिल्हानिहाय स्थितीचे सादरीकरण करण्यात आले. तसेच येत्या १५ दिवसांमध्ये १२ राज्यांना किती ऑक्सिजनची गरज लागू शकेल याचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. त्यामध्ये देशाला २० एप्रिलला चार हजार ८८०, २५ एप्रिलला पाच हजार ६१९, ३० एप्रिलला ६ हजार ५९३ टन ऑक्सिजनची गरज भासणार असल्याचे स्पष्ट झाले.

हजारो टन ऑक्सिजनची गरज

आरोग्य, उद्योग प्रोत्साहन, अंतर्गत व्यापार, पोलाद, रस्ते वाहतूक अशा विभागांकडून देशातील स्थितीविषयीची माहिती पंतप्रधानांनी घेतली. आताच्या स्थितीत सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय असण्याचे महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला. देशात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता, ती पूर्ण करण्यासाठी, ऑक्सिजननिर्मितीची क्षमतेविषयीदेखील पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. प्रत्येक प्रकल्पाच्या सध्याच्या ऑक्सिजननिर्मिती क्षमतेत वाढ करावी, अशी सूचना त्यांनी या वेळी दिली. तसेच पोलादनिर्मिती प्रकल्पांमध्ये असलेला अतिरिक्त ऑक्सिजन साठा वैद्यकीय उपयोगासाठी वापरला जावा, यावरही या बैठकीत चर्चा झाली.

विनाअडथळा वाहतूक महत्त्वाची

ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाणाऱ्या वाहनांची वाहतूक विनाअडथळा व्हावी, हे सुनिश्चित करा, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. सिलिंडर घेऊन जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक जलद आणि विनासायास व्हावी, यासाठी केंद्र सरकराने या गाड्यांना परवाना नोंदणीतून सवलत दिली आहे. वाढीव मागणीनुसार आवश्यक तेवढा ऑक्सिजन वेळेत गरजूंपर्यंत पोचावा, यासाठी सर्व टँकरची वाहतूक २४ तास सुरू राहील अशी व्यवस्था करण्याचे निर्देश सर्व राज्ये आणि वाहतूकदारांना दिले आहेत, अशी माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजनची हवाई वाहतूक करण्याची विनंती पंतप्रधानांना केल्याचे स्पष्ट केले होते.

ऑक्सिजन आयातीचे प्रयत्न सुरू

ऑक्सिजन सिलिंडर भरण्याची केंद्रे २४ तास सुरू राहणार असून, आवश्यक त्या सुरक्षा उपायांसह ती कार्यरत असतील. काही आवश्यक शुद्धीकरण प्रक्रियेनंतर, औद्योगिक वापरासाठीचा ऑक्सिजन वैद्यकीय कामांसाठी वापरण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. त्याचप्रमाणे नायट्रोजन आणि अर्गोन टँकर्स गरजेनुसार ऑक्सिजन टँकर्समध्ये परिवर्तित करण्यास परवानगी देण्यात आली. वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनची आयात करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com