
नवी दिल्ली : पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी कारवाई केल्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सकाळी साडेदहाला पत्रकार परिषद घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ची औपचारिक घोषणा केली. दहशतवाद्यांकडून भविष्यात होऊ शकणारे हल्ले रोखण्यासाठीच ही मोहीम राबविल्याचे मिस्त्री यांनी स्पष्ट केले. प्रथम निवेदन वाचून दाखविले. यावेळी लष्कराच्या प्रतिनिधी कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या प्रतिनिधी विंग कमांडर व्योमिका सिंग या उपस्थित होत्या. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची तपशीलवार माहिती दिली.