
चिंता वाढली! Omicron ची रुग्णसंख्या १०१ वर, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
नवी दिल्ली : सध्या जगावर ओमिक्रॉनचं संकट आहे. देशात देखील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. आज ओमिक्रॉनची संख्या १०१ वर (India Omicron Cases) पोहोचली असून ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: ओमिक्रॉन डेल्टालाही मागे टाकण्याची शक्यता: आरोग्य मंत्रालय
देशभरात 101 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, चंदीगढ या राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी जवळपास ३२ रुग्ण महाराष्ट्रात असून २२ रुग्ण दिल्लीत आहेत. राजस्थानमध्ये आतापर्यंत १७ रुग्ण आढळून आले असून कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी ८ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच गुजरात आणि केरळमध्ये प्रत्येकी पाच रुग्ण सापडले आहेत. आंध्र प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये ओमिक्रॉनचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण -
राज्यात ओमिक्रॉनचे एकूण ३२ रुग्ण आहेत. त्यापैकी १३ मुंबईत, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे महापालिका क्षेत्रात २, उस्मानाबादमध्ये २, कल्याण-डोंबिवली, नागपूर, लातूर, वसई-विरार आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. एकूण ३२ रुग्णांपैकी २५ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीत ओमिक्रॉनबाधितांचा आकडा आणखी वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे
Web Title: India Omicron Cases Rises To 101
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..