ओमिक्रॉन डेल्टालाही मागे टाकण्याची शक्यता; आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओमिक्रॉन डेल्टालाही मागे टाकण्याची शक्यता: आरोग्य मंत्रालय

ओमिक्रॉन डेल्टालाही मागे टाकण्याची शक्यता: आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली : कोरोनाच्या सध्यस्थितीबाबत आता आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. ओमिक्रॉनमुळे एकीकडे जगाची चिंता वाढलेली असताना नीती आयोगाचे सदस्य डॉ. वी के पॉल यांनी म्हटलंय की, युरोपमध्ये कोरोना रोगाचा एक नवीन टप्पा अनुभवायला मिळतो आहे. तसेच या ओमिक्रॉनच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय की, दक्षिण आफ्रिकेतील डेल्टा व्हेरियंटपेक्षा (Delta variant) ओमिक्रॉन हा अधिक वेगाने पसरतोय. (Omicron is spreading faster than the Delta variant) ज्याठिकाणी डेल्टाचं संक्रमण कमी आहे, त्याठिकाणी ओमिक्रॉनची चलती दिसून येतेय. ओमिक्रॉन हा व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटला मागे टाकण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने आरोग्य मंत्रालयाने आज ही महत्त्वाची माहिती दिली आहे. (Health Ministry on COVID19 situation)

हेही वाचा: UP सरकार म्हणतं 'ऑक्सिजन कमतरतेने मृत्यू नाहीत', पण हे 12 फोटो दाखवतात वास्तव

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी म्हटलंय की, ओमिक्रॉनचे रुग्ण जगातील 91 देशांमध्ये नोंदवले गेले आहेत. यांनी म्हटलंय की, सध्या भारतातील 11 राज्यांमध्ये 101 ओमिक्रॉनचे (Omicron cases ) रुग्ण आहेत. गेल्या 20 दिवसांपासून दररोज दहा हजारच्या खाली नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या 1 आठवड्यातील संक्रमणाचा दर हा 0.65% होता. सध्या, देशातील एकूण सक्रिय प्रकरणांमध्ये केरळचा वाटा ४०.३१% आहे. (Lav Agrawal, Joint Secretary, Health Ministry)

हेही वाचा: TET परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती स्थापन; वर्षा गायकवाड यांची माहिती

अनवाश्यक प्रवास, मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी जाणीवपूर्वक टाळण्याची हीच वेळ असून सण-समारंभ साजरे करताना याबाबतची काळजी घेणे फार महत्वाचे असल्याचं मत आयसीएमआरचे (ICMR) डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांनी मांडलंय.

भारत देश जगात सर्वाधिक दराने कोरोना लसीचे डोस देत आहे आणि दररोज दिल्या जाणाऱ्या डोसचा दर यूएसएमध्ये दिल्या जाणाऱ्या डोसच्या 4.8 पट आणि यूकेमध्ये दिल्या जाणाऱ्या डोसच्या दराच्या 12.5 पट आहे, अशीही माहिती दिली आहे.

Web Title: Omicron Variant Spreading Faster Delta Variant Likely Omicron Will Outpace Delta Variant Who

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Omicron Variant