
नवी दिल्लीः पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या होत्या. ‘‘ या संघर्षाच्या काळामध्ये सीमा एक आणि शत्रू तीन असे चित्र निर्माण झाले होते. यातही पाकिस्तान आघाडीवर होता. चीन आणि तुर्कीए त्याला मदत करत होते. भारतीय युद्धसज्जता आणि तैनातीबद्दल पाकिस्तानला चीनकडून महत्त्वाची माहिती पुरविली जात होती,’’ असा खळबळजनक खुलासा लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी आज केला. तसेच या पुढील काळात आपल्याला अधिक सावध राहावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.