मोदी सरकारला मोठा झटका; ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्समधून भारत 100 मधून बाहेर

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 11 September 2020

ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स २०२० Economic Freedom Index मध्ये भारत २६ स्थानांनी घसरुन १०५ व्या स्थानी पोहोचला आहे.

नवी दिल्ली- ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स २०२० Economic Freedom Index मध्ये भारत २६ स्थानांनी घसरुन १०५ व्या स्थानी पोहोचला आहे. याचा अर्थ भारतात आर्थिक व्यापार आणि व्यावसायिक वातावरण मागील वर्षापेक्षा वाईट परिस्थितीत गेलं आहे. २०१९ च्या रिपोर्टनुसार भारत ७९ व्या स्थानी होता, मात्र आता यात घसरण होऊन देश १०५ व्या स्थानी गेला आहे. 

रिपोर्टनुसार, जागतिक स्तरावरील व्यापार स्वातंत्र्य, आर्थिक मोबदला, मनुष्यबळ आणि व्यवयास नियमन यासारख्या कसोट्यांवर देशाची स्थिती चांगली नाही. त्यामुळे यावर्षी भारताची रँकिग घसरली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे. 

कुमारस्वामी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या भेटीला; राजकीय तर्कवितर्कांना उधाण

भारताची स्थिती

फ्रेजर इन्स्टिट्यूटने 'ग्लोबल इकॉनॉमिक फ्रिडम इंडेक्स' रिपोर्ट प्रकाशित केला आहे. यामध्ये व्यापार आणि व्यावसायिक घटकांवर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे मुल्यमापन केले जाते. यात वेगवेगळ्या मुद्द्यांना ० ते १० दरम्यान गुण दिले जातात. यात जेवढे गुण जास्त तेवढे स्वातंत्र्य अधिक आणि परिस्थिती चांगली असल्याचे मानलं जातं.  मागील वर्षी सरकारचा आकार आणि कामगिरी यासंदर्भात भारताला ८.२२ गुण होते. हाच आकडा आता ७.१६  झाला आहे. कायदेशीर बाबींचा विचार करता मागील वर्षी ५.१७ गुण होते, यात यावर्षी ०.११ अंकांनी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारातील स्वातंत्र्यासंदर्भातील गुण घसरुन ५.७१ झाले आहेत. श्रम तसेच व्यवसाय नियमन या क्षेत्रामध्ये ६.५३ गुण देण्यात आले आहेत. यात मागील वर्षीच्या तुलनेत ०.१० ची घसरण झाली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची अनेक मुद्यांवर घसरण झाल्याचं दिसत आहे. सेंटर फॉर सिव्हिल सोसायटी या दिल्लीतील बिगर सरकारी संस्थेने यासाठी काम केले होते. 

होणारं बाळ मुलगा की मुलगी? जोडप्याने बुर्ज खलीफावरून केलं जाहीर

या देशांचा पहिल्या १० मध्ये समावेश

रिपोर्टनुसार, हाँगकाँग आणि सिंगापूर अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत भारत चीनच्या पुढे आहे. चीनला या रिपोर्टमध्ये १२४ वे स्थान देण्यात आले आहे. पहिल्या १० देशांमध्ये हाँगकाँग, सिंगापूर, स्वित्झर्लंड, अमेरिका, मॉरिशस, जॉर्जिया, कॅनाडा आणि आयरलॅड या देशांचा समावेश आहे. जपान या यादीमुळे २० व्या स्थानी, जर्मनी २१ व्या स्थानी, इटली ५१ व्या, फ्रान्स ५८ व्या, रशिया ८९ व्या आणि ब्राझील १०५ व्या स्थानी आहे.  

सर्वात वाईट कामगिरी असणारे देश

आफ्रिकी देश या यादीमध्ये सगळ्यात खाली आहे. यात कांगो, झिम्बाब्वे, अल्जीरिया, इराण, सूडान, वेनेझुयला आदि देशांचा समावेश होतो. एकूण १६२ देशांचा समावेश रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. 

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India out of 100 in Global Economic Freedom Index 2020