लाहोर तर हिंदुंचे शहर, जाणून घ्या पाकिस्तानला का आणि कुणी दिलं?

कार्तिक पुजारी
Saturday, 11 July 2020

भारत आणि पाकिस्तानची फाळणी सामान्य गोष्ट नव्हती. हे एक हजारो वर्ष जुन्या सभ्यतेचे विभाजन होते. या जमीनीवर एका वशांचे आणि एका संस्कृतीचे लोक राहत होते.

नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तानची फाळणी सामान्य गोष्ट नव्हती. हे एक हजारो वर्ष जुन्या सभ्यतेचे विभाजन होते. या जमीनीवर एका वशांचे आणि एका संस्कृतीचे लोक राहत होते. पण आता हे कठोर सत्य आहे की भारत भूमी तीन भागांमध्ये विभागली गेली आहे. 4 जूलै रोजी ब्रिटनच्या संसदेने भारताच्या फाळणीस मंजुरी दिली. त्यानंतर विभाजनाचे काम सिरील रेडक्लिफ यांना देण्यात आले. 1947 साली रेडक्लिफ यांना भारतात बोलवण्यात आले होते. त्यांना भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषा निश्चित करायची होती.

विशेष म्हणजे रेडक्लिप यापूर्वी कधीही भारतात आले नव्हते, ना त्यांना भारताबद्दल फार काही माहिती होती. सुरुवातीला त्यांनी या कामाबाबत असमर्थता दाखवली होती, पण त्यानंतर त्यांनी आपलं काम जोमाने सुरु केलं. यामुळेच असावं फाळणी दरम्यान अनेक चुका झाल्या होत्या. भारत आणि पाकिस्तान फाळणीवेळी दोन्हीकडच्या लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. रेडक्लिफ यांनी परत लंडनमध्ये गेल्यानंतर फाळचीच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे जाळून टाकल्याचं सांगितलं जातं.

अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून घोषणा
तर लाहोर भारतात असला असता

भारतीय पत्रकार कुलदीप नायर यांनी स्वातंत्र्यानंतर लंडनमध्ये जाऊन रेडक्लिफ यांची भेट घेतली होती. कुलदीप नायर यांनी बीबीसीसोबत याबाबत संवाद साधला. नायर यांनी रेडक्लिफसोबत झालेल्या चर्चेचा काही भाग सांगितला. रेडक्लिफ म्हणाले होते की, "सीमारेषा निश्चित करण्यासाठी मला 10 ते 11 दिवस मिळाले होते. त्यावेळी मी केवळ एकवेळ विमानातून या भागाची पाहणी केली होती. माझ्याकडे जिल्ह्यांचे नकाशे नव्हते. मला लाहोरमध्ये हिंदूंची संपत्ती अधिक दिसली. मात्र, मला हेही लक्ष्यात आलं की पाकिस्तानच्या वाट्याला कोणतंही मोठं शहर आलं नाही. त्यामुळे मी लाहोरला भारताकडून काढून घेऊन पाकिस्तानला दिलं. याला चूक म्हणा किंवा बरोबर पण त्यावेळी माझा नाईलाज होता. पाकिस्तानचे लोक माझ्यावर नाराज आहेत, पण त्यांना खूश व्हायला हवं कारण मी त्यांना लाहोर देऊन टाकलं होतं"

दार्जिलिंग नका देऊ, तिथे सुट्टीसाठी जायचं असतं

दार्जिलिंग आजही भारतातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे. याचाही एक किस्सा रेडक्लिफ यांनी सांगितला होता. बाऊंड्री कमीशनमधील एका बंगाली व्यक्तीने त्यांना असं सांगितलं होतं की, मी आणि माझं कुटुंब उन्हाळ्यात सुट्टीची मजा घेण्यासाठी दार्जिलिंगला जात असतो. त्यामुळे दार्जिलिंग पाकिस्तानच्या वाट्टाला गेले तर आम्हाला अडचण येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india pak partition cyril radcliffe give lahor to pakistan because they havent any big city