
नवी दिल्ली : भारतीय लष्कर अन् हवाई दलाने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांत अक्षरशः भाजून निघालेल्या पाकिस्तानने आज अखेर नांग्या टाकत शस्त्रसंधी केली. अमेरिकेकडे याचना करत पाकिस्तानी नेतृत्वाने माघार घेतली खरी पण रात्री पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये विश्वासघात करत याच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी लष्कराने सीमावर्ती भागांत केलेल्या गोळीबारास भारतीय जवानांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणांवर पाकिस्तानी ड्रोन पाहायला मिळाले असून काही भागांत स्फोटांचे आवाज ऐकू आले.