Anjali-Sufi Breakup: भारताच्या अंजलीने पाकिस्तानच्या सुफी मलिकला दिली सोडचिठ्ठी; लेस्बियन कपलने वेगळं होण्याचं सांगितलं कारणं

Anjali-Sufi Breakup: जवळपास ५ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर भारताची अंजली चक्रा आणि पाकिस्तानी सुफी यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या लेस्बियन कपलने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आता अंजलीने सूफीवर धोका दिल्याचा आरोप केला आहे.
Anjali-Sufi Breakup
Anjali-Sufi Breakupesakal

Anjali-Sufi Breakup: पाकिस्तानची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूफी मलिक आणि भारतीय अंजली चक्र यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वर्षांपूर्वी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने हे लेस्बियन जोडपे चांगलेत चर्चेत आले होते. आता अंजलीने सुफीवर बेईमानी केल्याचा आरोप करत ब्रेकअपची केल्याचे सोशल मिडीयावर सांगितले आहे. तर सूफीने आपली चूक आधीच मान्य केली होती. हे लेस्बियन कपल तेव्हाच चर्चेत आले जेव्हा दोघींनी त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. आता अंजलीने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून सुफीवर बेईमानी आरोप केला आहे.

हे लेस्बियन कपल २०१९ मध्ये चांगलेच चर्चेत आले होते, जेव्हा दोघींनी त्यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर शेअर केला होता. अंजलीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहले की, हा मोठा धक्का असू शकतो पण सत्य हे आहे की आता आम्ही वेगळे झालो आहे. सुफीच्या बेईमानीमुळे मी माझे लग्न आणि नातेसंबंध संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पण सुफीबद्दल कोणीही वाईट बोलू नये.

Anjali-Sufi Breakup
Loksabha: आधी एका मतासाठी व्हायचे 30 पैसे खर्च, आता एका मतावर किती होतो खर्च? जाणून घ्या मतदानाचं ताळेबंद

काही आठवड्यांपूर्वी सुफीने इंस्टाग्रामवर आपण चुक केल्याची कबुलीही दिली होती. लग्नाच्या काही आठवड्यांपूर्वी तिने आपल्या पार्टनरची फसवणूक केली आणि ही तिची चूक असल्याचे सूफीने म्हटले होते. सुफी म्हणाली होती, मी ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करते त्याला मी दुखावते. जिची मला सर्वात जास्त काळजी आहे तिने माझा विश्वासघात केला आहे. हे जोडपे पाच वर्षे एकत्र होते. दोघींनी लग्नही केले होते.

Anjali-Sufi Breakup
CM Arvind Kejriwal : 'रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत औषधे द्यावीत', अरविंद केजरीवाल यांचा ईडीच्या कोठडीतून दुसरा आदेश

अंजली न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वेडिंग प्लानिंगचे काम करते. सुफी लाइफस्टाइल आणि ट्रॅव्हल कंटेट क्रिएटर आहे. अंजलीने असेही म्हटले आहे की, तिने तिची ऑनलाइन लग्नाची रजिस्ट्री देखील रद्द केली आहे. या दोघांचे एक यूट्यूब चॅनल आहे ज्याचे एक लाखाहून अधिक सब्सक्राइबर आहेत. त्या सोशम मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. त्या कायमच आपल्या पोस्टमुळे चर्चेत असत. त्या दोघी आपले फोटो सोशल मिडीयावर कायमच शेअर करत.

Anjali-Sufi Breakup
Jaggi Vasudev Brain Surgery Update : जग्गी वासुदेव यांची इमर्जन्सी ब्रेन सर्जरीनंतर कशी आहे तब्येत? व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com