
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून पाकिस्तानने ड्रोनने भारतावर अनेक हलेले केला, परंतु भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांचे मनसुबे उधळून लावत चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पीडीपी प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की लष्करी हस्तक्षेपापेक्षा राजकीय हस्तक्षेपाची गरज आहे.