
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने १५ मे रोजी सकाळी ५:२० वाजेपर्यंत देशातील २४ विमानतळ नागरी उड्डाणांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, ls १० मे पर्यंत लागू करण्यात आले होते. पण ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानच्या अयशस्वी ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नानंतर यात वाढवण्यात आला. बंद करण्यात आलेल्या विमानतळांमध्ये चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भुंतर, किशनगड, पठाणकोट, शिमला, जैसलमेर, जम्मू, बिकानेर, लेह, पोरबंदर, पटियाला या शहरांचा समावेश आहे.