India Pakistan War: भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. दोन्ही बाजूंनी ड्रोन हल्ले आणि गोळीबारही सुरु आहे. भारतानं पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टिम्सही उद्ध्वस्त केले आहेत. यापार्श्वभूमीवर एकीकडं पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दुसऱ्या बाजूनं किल्ला लढवायला सुरुवात केली आहे. युद्धाची शक्यता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय समुदायाशी ते सातत्यानं फोनवरुन संपर्क साधत आहेत. या समुदयाचा पाठिंबा ते मिळवत आहेत.