India retaliates after Pakistan's drone and missile attack using Akash, S-400, Shilka and L70 : ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं गुरुवारी रात्री जम्मू, राजस्थान आणि पंजाबच्या काही भागांमध्ये ड्रोन हल्ले केले. तसेच भारतातील विविध भागात मिसाईल आणि लढाऊ विमानांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने पाकिस्तानच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. रात्रभरात भारताकडून आकाश आणि एस-400 अशा अत्याधुनिक शस्त्राचा वापर करत पाकिस्तानला धडा शिकवण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तानला प्रत्यत्तुर देताना भारताने नेमक्या कोणत्या शस्रांचा वापर केला, जाणून घेऊया.