भ्रष्ट देशांच्या क्रमवारीत अल्प प्रगती 

वृत्तसंस्था
Friday, 20 November 2020

‘ट्रेस- असे नाव असलेल्या संस्थेने जगातील १९४ देशांचे मुल्यमापन केले. गतवर्षी भारत ४८ दोषाकांसह ७८व्या स्थानावर होता. आता दोषांक तीनने कमी होऊन ४५ झाले असून क्रमांक एकने वर जाऊन ७७ झाला आहे. 

नवी दिल्ली - आत्मनिर्भर बनण्याचा संकल्प सोडलेल्या भारताची भ्रष्ट देशांच्या यादीत एकाच क्रमांकाने अल्प प्रगती झाली आहे. उद्योगाशी संबंधित लाचखोरीच्या धोक्यांनुसार क्रमवारी निश्चित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने तसा अहवाल दिला आहे. 

‘ट्रेस- असे नाव असलेल्या संस्थेने जगातील १९४ देशांचे मुल्यमापन केले. गतवर्षी भारत ४८ दोषाकांसह ७८व्या स्थानावर होता. आता दोषांक तीनने कमी होऊन ४५ झाले असून क्रमांक एकने वर जाऊन ७७ झाला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सख्खे शेजारी 
शेजारी देशांत भूतानचा (४८) क्रमांक सर्वोत्तम आहे, पण पाकिस्तान (१५३), नेपाळ (१०७), चीन (१२६) व बांगलादेश (१६६) यांचा क्रमांक खाली आहे. 

चीनला प्रमाणपत्र 
या अहवालात जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या चीनला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. चीनने नोकरशाहीचे सुसुत्रीकरण सुरू ठेवले आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी लाच मागण्याची शक्यता कमी करणे तेथे शक्य झाले आहे, असे नमूद करण्यात आले. 

दृष्टिक्षेपात 
- पहिला अहवाल २०१४ मध्ये 
- १९४ एकूण देश 
- अव्वल स्थान डेन्मार्क 
- तळातील देश उत्तर कोरिया 
- आधीच्या क्रमवारीत सोमालिया तळात 
- आता सोमालिया १८७वा 

संस्थेचे अहवालामागील उद्देश 
१) उद्योग विश्वासाठी अधिक विश्वासार्ह वातावरण निर्मित 
२) जगभरातील व्यवसायाशी संबंधित लाचखोरी कमी होण्यासाठी सूक्ष्म माहिती 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

निकष असे 
१) सरकारबरोबर व्यवसायाबाबत चर्चा 
२) लाचखोरी प्रतिबंध उपाय व अंमलबजावणी 
३) सरकारी, नागरी सेवेतील पारदर्शकता 
४) नागरी संस्थांच्या पर्यवेक्षणाची क्षमता 
५) प्रसार माध्यमांची भूमिका 

कशी ठरते क्रमवारी 
- सार्वजनिक हितासाठी काम करणाऱ्या संस्थांची आकडेवारी 
- आंतरराष्ट्रीय संस्था, संघटनांकडूनही माहिती 
- युनायटेड नेशन्स (संयुक्त राष्ट्रे) 
- जागतिक बँक 
- गॉथेनबर्ग विद्यापीठातील व्ही-डेम संस्था 
- जागतिक आर्थिक परिषद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India progress in the list of the most corrupt countries