

NMACC and Qatar Museums Sign Five-Year Agreement
Sakal
कतार : कतार म्युझियम्स आणि मुंबईतील निता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) यांच्यात शैक्षणिक क्षेत्रात एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण करार झाला आहे. २१ डिसेंबर २०२५ रोजी दोहा येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात कतार म्युझियम्सच्या अध्यक्षा शेखा अल मायासा बिंत हमाद बिन कलिफा अल थानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालिका ईशा अंबानी यांनी या पाच वर्षांच्या धोरणात्मक भागीदारीवर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे भारत आणि कतार या दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध अधिक दृढ होणार आहेत.