esakal | गुड न्यूज! भारताच्या R व्हॅल्यूमध्ये घट; पहिल्यांदाच असं घडलं
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

भारतात कोरोना (corona) महामारीचा प्रकोप सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच इफेक्टिव रिप्रोडक्शन नंबर किंवा R व्हॅल्यू कमी (India R value drops) झाली आहे.

Corona: भारताच्या R व्हॅल्यूमध्ये घट; पहिल्यांदाच असं घडलं

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतात कोरोना (corona) महामारीचा प्रकोप सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच इफेक्टिव रिप्रोडक्शन नंबर किंवा R व्हॅल्यू कमी (India R value drops) झाली आहे. कोरोनाचा प्रसार किती वेगात होतोय, याचा निर्दशक R व्हॅल्यू असतो. सध्या R व्हॅल्यू 0.82 या न्यूनतम पातळीला आली आहे. कोरोना महामारीचा प्रभाव कमी होतोय, हे समजण्यासाठी R निदर्शक सातत्याने 1 पेक्षा कमी असणे आवश्यक असते. इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल साईन्स चेन्नईचे संशोधक सिताभ्रा सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार, R व्हल्यूमध्ये घट होण्याचे मुख्य कारण महाराष्ट्र आणि केरळ राज्यांमध्ये सुधारणारी कोरोना स्थिती. भारताची R व्हॅल्यू सलग दुसऱ्या आठवड्यात 1 च्या खाली आले. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचा हा परिणाम आहे. (India R value drops lowest ever since Covid pandemic began last year)

देशात नोंदल्या गेलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरुन R व्हॅल्यू काढली जाते. यात लक्ष देण्याची बाब म्हणजे जितका डेटा अॅक्युरेट असेल, तितकी R व्हॅल्यू योग्य असते. देशातील अनेक प्रमुख राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. कर्नाटकचा R व्हल्यू 0.80 पेक्षा कमी झाला आहे, तो एक आठवड्यापूर्वी 1.04 होता. महाराष्ट्राचा R व्हॅल्यू सध्या 0.76 आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याने एका महिन्याच्या काळात R व्हॅल्यू कमी झाली आहे. 'द प्रिंट'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

हेही वाचा: 'तौक्ते' वादळ: नुकसानभरपाई देण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा

केरळची R व्हॅल्यू मागील महिन्यात 1.05 होती, ती आता 0.78 झालीये. राज्यात सध्या कोरोनाचे 2,59,559 सक्रिय रुग्ण आहेत. आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालचा R व्हॅल्यू 1 च्या जवळपास आहे. मागील आठवड्यात या राज्यातील R व्हॅल्यू अनुक्रमे 1.08 आणि 10.4 होता. राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, मध्य प्रदेश, हरियाणा, बिहार आणि गुजरात या राज्यांचा R व्हॅल्यू 1 च्या खाली आहे. उत्तर प्रदेशचा R व्हॅल्यू 0.56 आहे, आतापर्यंतचा हा सर्वात कमी आकडा आहे. दिल्लीतील लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसून आलाय. राज्याचा R व्हॅल्यू 0.43 आहे.

हेही वाचा: Viral Video: नवऱ्याने 'कबूल है' म्हणताच नवरीचं जबरदस्त सेलिब्रेशन!

काही राज्यांमध्ये परिस्थिती सुधारत असली, तरी काही राज्यांमध्ये R व्हॅल्यू जास्त आहे. तमिळनाडूचा R व्हॅल्यू 1.22 झाला आहे. मागील आठवड्यात तो 1.29 होता. ओडिशाची R व्हॅल्यू 1.06 आहे. या राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्याचा R व्हॅल्यू 0.64 आहे, तर मुंबईचा R व्हॅल्यू सातत्याने 1 पेक्षा कमी आहे.