esakal | 'तौक्ते' वादळग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

'तौक्ते' वादळ: नुकसानभरपाई देण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना 'तौक्ते' चक्रीवादळाचा (tuakte cyclone) तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केली आहे. (Cm uddhav thackeray announced help to taukte cyclone affected people)

२१ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही असे आश्वस्त केले होते त्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली.

हेही वाचा: 'झिंगाट गाण्यावर डान्स करणाऱ्या रोहित पवारांवर कारवाई करा'

"विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी कोकणवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही. पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नुकसान भरपाईवर दोन दिवसात निर्णय घेऊ" अशी माहिती मुख्यंत्र्यांनी उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिली होती.

हेही वाचा: 'मोदी कंगनाला भेटू शकतात, पण संभाजी राजेंना का नाही?'

"वादळात (Cyclone) नुकसान झालेल्यांना मदत करणार, हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरून पाहणी करतोय. फोटोसेशन करायला येथे मी आलेलो नाही तर मदत करण्यासाठी आलेलो आहे. तौक्ते निसर्ग चक्रीवादळाच्या आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर होते" यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

"मी माझ्या कोकणवासियांना दिलासा द्याला आलो आहे. विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आलो नाही. आता जिल्ह्याची आढावा बैठक झाली. कोकणचे वादळात मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे दोन दिवसात होतील. निकष बदलण्याची आमची मागणी आहे. निकष बदलून कोकणवासीयांना दिलासा मिळेल" असे मुख्यमंत्री म्हणाले होते.