

भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी याबाबत माहिती देत या दोन्ही राज्यांतील मतदारांचे कौतुक केले आहे. निवडणूक आयोगाच्या विविध जनजागृती मोहिमांचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.