
चिंगदाओ (चीन) : पहलगाम हल्ल्याचा निषेध केला नसल्याने आणि पाकपुरस्कृत दहशतवादाबाबत भारताला वाटणाऱ्या चिंतेची पुरेशी दखल न घेतल्याने संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संयुक्त निवेदनावर सही करण्यास नकार दिला. यामुळे संरक्षणमंत्र्यांची ही परिषद कोणत्याही संयुक्त निवेदनाविनाच आटोपली.