
नवी दिल्ली : व्यापार रोखण्याच्या धमकीमुळेच भारत पाकिस्तानचा संघर्ष थांबला हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारताने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान अमेरिकेशी झालेली चर्चा केवळ लष्करी मुद्द्यांवर होती. त्यात व्यापाराचा कोणताही विषय नव्हता, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच, जम्मू-काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे भारताचे धोरण कायम असून पाकव्याप्त काश्मीर परत मिळविण्याची भूमिकाही कायम असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.