esakal | Corona Update: आतापर्यंत 1 कोटी 21 लाख जणांना कोरोनाची लस, जाणून घ्या आकडेवारी

बोलून बातमी शोधा

Corona

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष करुन महाराष्ट्र आणि केरळ राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.

Corona Update: आतापर्यंत 1 कोटी 21 लाख जणांना कोरोनाची लस, जाणून घ्या आकडेवारी
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष करुन महाराष्ट्र आणि केरळ राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे नवे 13,742 रुग्ण सापडले आहेत, तर 14,037 लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 104 लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे. 

मोठी बातमी! महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या प्रवाशांसाठी 'कोरोना' नियम

नवे 13,742 रुग्ण सापडल्याने देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,10,30,176 झाली आहे. आतापर्यंत  1,07,26,702 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूने 1,56,567 रुग्णांचा बळी घेतला आहे. कोरोना मृत्यूदर देशात कमी असल्याचं दिसून आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा कमी आहे. देशात सध्या 1,46,907 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. 

देशात 16 जानेवारीला कोरोना लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत देशात 1,21,65,598 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. शिवाय दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीमही हाती घेण्यात आली आहे. प्रामुख्याने देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील जवळपास 40 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. फ्रॅंटलाईन वर्कर्संनाही कोरोनाची लस दिली जात आहे. 

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी जवळपास 70 टक्के रुग्ण महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब या पाच राज्यातून आहेत. विशेष करुन महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.  पुण्यामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब राज्यातून दिल्ली येणाऱ्या नागरिकांनी निगेटिव्ह RT-PCR दाखवल्यावर दिल्लीमध्ये एंट्री मिळणार आहे.