
नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले असून गेल्या २४ तासात भारतात २ हजार ३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्याचबरोबर देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख ५४ हजार ६५ वर पोहचली आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
२४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १० हजार ९७४ रुग्ण वाढले असून, देशातील एकूण ३ लाख ५४ हजार ६५ करोनाबाधित रुग्णांपैकी सध्या १ लाख ५५ हजार २२७ जणांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत १ लाख ८६ हजार ९३५ जणांना उपचारानंतर रुग्णलायतू सुट्टी देण्यात आली आहे. तर, आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात ११ हजार ९०३ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रिय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
-------------
लॉकडाऊनच्या काळात तुम्हीही काढू शकता पैसै; कसे ते घ्या जाणून
--------------
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा दस का दम; दहाव्या दिवशीही वाढले दर
--------------
अभिमानास्पद! 'Black live Matter'आंदोलनाचे नेतृत्व एका भारतीय-अमेरिकन महिलेच्या हाती
---------------
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४६ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशभरात प्रतिदिन नमुना चाचण्यांची क्षमता ३ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. सरकारी वैद्यकीय प्रयोगशाळेप्रमाणे अधिकाधिक खासगी प्रयोगशाळांना सहभागी करून घेण्याचे धोरण केंद्राने अवलंबले आहे. आत्तापर्यंत प्रतिदिन दीड लाखांपर्यंत नमुना चाचण्या केल्या जात होत्या. खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांनी कमी किमतीत नमुना चाचण्या करण्याचेही आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.