esakal | धडकी भरवणारी वाढ! गेल्या २४ तासांत आढळले २५,३२० नवे कोरोना रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

धडकी भरवणारी वाढ! गेल्या २४ तासांत आढळले २५,३२० नवे कोरोना रुग्ण

चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे

धडकी भरवणारी वाढ! गेल्या २४ तासांत आढळले २५,३२० नवे कोरोना रुग्ण

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

देशाला कोरोना महामारीचा पडलेला विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांत सुमारे एक लाखांपेक्षा जास्त नवी रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या सहा राज्यांत ८५ टक्के नवे रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयानं रविवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या एक कोटी १३ लाख ५९ हजार ४८ इतकी झाली आहे. 

कोरोनामुळे देशातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या माहितीनुसार, रविवारी देशात २५ हजार ३२० कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांस १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत देशात १६ हजार ६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी वाढलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे एकूण रुग्णांची संख्या एक कोटी १३ लाख ५९ हजार ४८ इतकी झाली आहे.

आतापर्यंत एक कोटी ९ लाख८९ हजार ८९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या दोन लाख १० हजार ५४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एक लाख ५८ हजार ६०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ८ लाख ६४ हजार ३६८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

एका दिवसात सर्वाधिक लोकांना लस भारतात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. एका व्यक्तीला दोन लसीचे डोस दिले जात असून या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर असते. देशात शुक्रवारी 20.53 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतापर्यंत ही सर्वात मोठी आकडेवारी असल्याने लसीकरणाचा हा एका दिवसातील विक्रम आहे. सर्वाधिक 3.3 लाख लशीचे डोस उत्तर प्रदेशमध्ये देण्यात आले आहेत. आतापर्यंत 74 टक्के डोस उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, बिहार, केरळ आणि कर्नाटक या राज्यांना देण्यात आले आहेत.