esakal | Corona Update : 24 तासांत 3.92 लाख नवीन रुग्ण

बोलून बातमी शोधा

Corona Updates
Corona Update : 24 तासांत 3.92 लाख नवीन रुग्ण
sakal_logo
By
नामदेव कुंभार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला आहे. दिवसागणिक परिस्थिती अतिशय चिंताजनक होत चालली आहे. 15 दिवसांपासून देशात दररोज तीन लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळत आहे. केंद्रीय आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत तीन लाख 92 हजार 488 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 30 एप्रिल रोजी 4 लाखांचा टप्पा ओलांडला होता. त्या तुलनेती आजचे आकडे कमी असले तरी परिस्थिती चिंताजनकच आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत तीन लाख 7 हजार 865 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर तीन हजार 689 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक कोटी 95 लाख 57 हजार 457 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत एक कोटी 59 लाख 92 हजार 271 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

हेही वाचा: भारतात लवकरात लवकर लॉकडाऊन गरजेचा;डॉ. फाऊचींनी मोदींना सुचवला फॉर्म्युला

देशात कोरोनाचे 33 लाख 49 हजार 644 रुग्ण उपचाराधीन आहेत. तर दोन लाख 15 हजार 542 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.