कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी, पाच महिन्यातील  सर्वाधिक वाढ

कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी, पाच महिन्यातील  सर्वाधिक वाढ

वर्षभरापूर्वी कोरोना महामारीचं देशात आगमन झालं होतं. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी गतवर्षी २२ मार्च २००० रोजी देशात जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. पण आज वर्षभरानंतरही देशात कोरोना रुग्णांची संख्या थांबवण्याची चिन्हे दिसत नाही. देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे.  महाराष्ट्र, पंजाब आणि मध्यप्रदेश सारख्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये लॉकडाउनही लावण्यात आला आहे.  

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक नवनवीन विक्रम प्रस्थापीत करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रायलानं सोमवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशांमध्ये ४६ हजार ९५१ नवीन रुग्णांची नोंद झाली.  मागील पाच महिन्यातील ही सर्वात मोठी वाढ ठरली.  तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या आकडेवारीनेही चिंता वाढवली आहे. २४ तासांत देशात २१२ पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

पाच महिन्यातील सर्वात मोठी वाढ - 
कोरोनाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत देशात 46,951 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यासोबतच देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या  एक कोटी १६ लाख ४६ हजार ८१ इतकी झाली आहे. ५ नोव्हेंबर २००० रोजी देशात ४७ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पाच महिन्यानंतर ही आकडेवारी मागे पडली आहे. मागील २४ तासांत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या २१२ इतकी झाली आहे. त्यासोबतच एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या  एक लाख ५९ हजार ९६७ इतकी झाली आहे.

उपचाराधिन रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी -
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत २१ हजार १८० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत एक कोटी ११ लाख ५१ हजार ४६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ठिक होणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. गेल्या काही दिवसांपासून उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या तीन लाख ३४ हजार ६४६ इतकी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com