देशात कोरोनाने पुन्हा घेतला वेग; सक्रीय रूग्णांची संख्या 40 हजार पार

देशात गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे 10 टक्क्यांनी वाढले आहे.
corona
corona sakal media

नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन (Corona Active Cases In India) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत असून, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 8,329 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे 10 टक्क्यांनी वाढले आहे. 7 जून रोजी देशात दैनंदिन रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे होती, आता ही संख्या आठ हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. (Corona India Active Cases Update News)

दिवसागणिक वाढत जाणाऱ्या आकडेवारीनंतर देशातील कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या आता 40,370 वर पोहोचली असून, गेल्या चोवीस तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.09 टक्के आहे, तर कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.69 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. देशातील कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर 2.41 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 1.75 टक्के इतका नोंदवला गेला आहे.

corona
कोरोना चाचण्या वाढविण्याचे आदेश : आरोग्य विभाग सतर्क

महाराष्ट्रातील आकडेवारी वाढतीच

गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, गेल्या 24 तासांत राज्यात 3,081 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 1323 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या 13,329 इतकी नोंदवण्यात आली आहेत.

राज्यतील रुग्ण बरे होण्याचा दर 97.96 टकके झाला असून, मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक 9,191 सक्रिय रूग्ण मुंबईत नोंदवण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ ठाण्याचा नंबर असून, येथे 2,157 सक्रिय रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पुण्याचा नंबर असून, येथे 884 कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

corona
अद्याप चौथी लाट नाही; पण काळजी हवी!

देशातील चौथ्या लाटेबद्दल ICMR च्या तज्ज्ञांचे मोठं विधान

देशातील काही भागांमध्ये कोरोनाच्या नव्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, वाढती रूग्णसंख्या म्हणजे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेला सुरुवात झाली आहे, असे विधान करणं चुकीचं आहे. चौथ्या लाटेबाबत भाष्य करण्यापूर्वी जिल्हा स्तरावर माहिती एकत्र करून त्याचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे, असे मत ICMR चे एडीजी सिमरन पांडा यांनी स्पष्ट केलं. देशभरातील प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीपेक्षा काही जिल्ह्यांतील प्रकरणांची संख्या एकसमान मानली जाऊ शकत नाही. प्रत्येक व्हेरिएंट हा चिंतेचा प्रकार नसतो असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com