सावधान! कोरोनाबाधितांनी ओलांडला दोन लाखांचा टप्पा

पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाखाच्या पुढे गेली आहे.
Corona Update
Corona UpdateSakal Media

Coronavirus Updates: नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक ठरताना दिसत आहे. बुधवारी (ता.१४) दिवसभरात नोंदवली गेलेली आकडेवारी मनात धडकी भरवणारी ठरली आहे. मंगळवारी (ता.१३) आतापर्यंतची एका दिवसातील सर्वोच्च नोंद झाली होती. कोरोना आटोक्यात येईल की नाही, असा सर्वजण विचार करत असताना बुधवारी समोर आलेल्या आकडेवारीने चिंता आणखी वाढवली आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ७३९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Corona Update
धक्कादायक! रुग्णालयातून कोरोना प्रतिबंधक लसीचे ३२० डोस चोरीला; गुन्हा दाखल

कोरोना संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. केंद्र तसेच राज्य सरकार यासाठी कठोर पावले उचलत आहे. लसीकरण मोहिमही सध्या वेग घेत आहे, असे असले तरीही कोरोना काही आटोक्यात येत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत नाही. दरदिवशी १० ते १५ हजार रुग्णांची भर पडत चालली आहे. बुधवारी दिवसभरात सापडलेल्या रुग्णांसह कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ झाली आहे. बुधवारी दिवसभरात १०३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख ७३ हजार १२३ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

Corona Update
Video: कोरोना गेला उडत; कुंभमेळ्यात गंगा आरतीवेळी तोबा गर्दी

सध्या देशभरात १४ लाख ७१ हजार ८७७ लोक कोरोनाने ग्रस्त आहेत. आतापर्यंत १ कोटी २४ लाख २९ हजार ५६४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर ११ कोटी ४४ लाख ९३ हजार २३८ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आतापर्यंत २६ कोटी २० लाख ३ हजार ४१५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात १३ लाख ८४ हजार ५४९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com