Narendra Modi: भारत सरकारच्या निर्णयामुळे 3 देश आले अडचणीत; मदतीसाठी मोदींना साद

narendra modi
narendra modifile photo

India rice export ban caused rise in rice prices

नवी दिल्ली- तांदळाची निर्यात करणारा सर्वात मोठा देश भारताने बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी आली आहे. याचा परिणाम अनेक देशांवर पडल्याचं पाहायला मिळत असून त्यांनी भारताकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केलीये.जगातील अनेक देश तांदळासाठी भारतावर अवलंबून आहेत. त्यामुळे भारताने लावलेली निर्यात बंदी उठवावी अशी मागणी ते करत आहेत.

सिंगापूर, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स देशामध्ये तांदळाचे भाव वाढत आहेत. हे देश तांदळासाठी भारतावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली असून भारत सरकारने पुन्हा निर्यात सुरु करावी अशी विनंती केली आहे. मिंटने दिलेल्या रिपोर्टनुसार, सिंगापूरने भारताकडून ११०००० टन तांदळाची मागणी केली आहे. जून महिन्यात इंडोनेशियाने अल नीनोच्या संकटापूर्वी भारताकडून १० लाख टन तांदुळ खरेदी करण्याची घोषणा केली होती.

narendra modi
Manipur Violence: मणिपूर हिंसाचारप्रकरणी स्थापन केलेल्या समितीकडून सुप्रीम कोर्टात 3 रिपोर्ट सादर

अल नीनोमुळे वातावरणात फरक पडला असून नैसर्गिक चक्र बिघडले आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. फिलीपाईन्स हा देशही तांदळासाठी भारतावर अवलंबून आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्राने भारताकडे मानवीय कार्यातील मदतीसाठी २ लाख टन तांदळाची मागणी केली होती. सध्या युक्रेन युद्धामुळे धान्य पुरवठ्यात अडचण निर्माण झालीये. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने तांदुळ निर्यात बंदीला घातक असल्याचं म्हटलं होतं.

जगभरात महागाई वाढत आहे. भारतात महागाईने उच्चांक गाठला आहे. नरेंद्र मोदी सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदीसह अनेक उपाय करत आहे. येत्या लोकसभा डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकारला महागाई नियंत्रणात ठेवावी लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात सरकारकडून आणखी काही कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. अशावेळी भारतावर अवलंबून असलेल्या देशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

narendra modi
धक्कादायक! बोट छाटलेल्या प्रकरणात सरकारमधील दोन मंत्री आरोपी; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

२०२२ मध्ये सिंगापुरच्या एकूण तांदळाच्या आयातीपैकी ४० टक्के भारतातून झाली होती. त्यामुळे सिंगापुरला भारताच्या निर्णयाचा फटका बसलाय. भारत जवळपास ३० देशांना तांदुळ निर्यात करतो. तांदूल निर्यातीत भारत मोठा देश असून जागतिक व्यापारात एकूण ४० टक्के हिस्सा भारताचा आहे. त्यामुळे अनेक देशांना भारताच्या निर्णयाचा फटका बसणार आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com