धक्कादायक! बोट छाटलेल्या प्रकरणात सरकारमधील दोन मंत्री आरोपी; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

धक्कादायक! बोट छाटलेल्या प्रकरणात सरकारमधील दोन मंत्री आरोपी; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Mumbai News : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील धनंजय ननावरे यांनी ऑनकॅमेरा आपले बोट छाटून गृहमंत्र्यांना पाठवत असल्याचं म्हटलं होतं. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सरकारमधले दोन मंत्री दोन मंत्री आरोपी असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

धनंजय ननावरे यांचे बंधू नंदकुमार ननावरे यांनी १ ऑगस्ट रोजी आपल्या पत्नीस इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात काही लोकांचे नावे असलेली चिठ्ठी सापडली होती. पण या प्रकरणात पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करत धनंजय ननावरे यांनी कॅमेरा सुरू करून आपल्या हाताचे बोट छाटले. या घटनेनंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

धक्कादायक! बोट छाटलेल्या प्रकरणात सरकारमधील दोन मंत्री आरोपी; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
Maharashtra Politics: दानवेंच्या मुलाचा साखरपुडा शिरसाटांचा गोडवा, कट्टर विरोधकांच्या त्या फोटोमुळे भुवया उंचावल्या

या प्रकरणी संजय राऊत यांना गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, बोट छाटलेल्या प्रकरणात शिंदे सरकारमधले दोघे मंत्री सहभागी आहेत. एक मुंबईतला आणि एक साताऱ्यामधला आहे. हे विदारक चित्र आहे, तरीही गृहमंत्र्यांना वेदना कळत नसतील तर अवघड आहे.

''मुख्य आरोपी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत. या प्रकरणातलं पूर्ण सत्य समोर आलं पाहिजे. माणुसकी असती तर त्या भावाला समोर बसवून गृहमंत्र्यांनी चर्चा केली असती. अमानुष पद्धतीने राज्यकर्ते वागत आहेत'' असा घणाघात राऊतांनी केला.

धक्कादायक! बोट छाटलेल्या प्रकरणात सरकारमधील दोन मंत्री आरोपी; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
Maharashtra Politics : लोकसभेसाठी संजय राऊत मैदानात? मुंबईतील 'या' जागेवरून लढवू शकतात निवडणूक

संजय राऊत पुढे म्हणाले की, ठाणे मनपाच्या रुग्णालयात २४-२७ रुग्ण मृत्यूमुखी पडतात. तुमचं ठाणं आहे तर मृत्यू का रोखू शकला नाहीत..आणि निघालात महाराष्ट्र घडवायला. राज्यात अनागोंदी सुरु असल्याचं राऊतांनी म्हटलं.(Latest Marathi News)

दरम्यान, याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हिडीओमध्ये धनंजय ननावरे जी नावे घेत आहेत, ती नावे आणि त्यांच्या भावाने उल्हासनगरमध्ये पत्नीसह आत्महत्या केल्यावेळी चिठ्ठीत लिहून ठेवलेली नावे यात तफावत असल्याने पोलिस त्याचा तपास करीत आल्याचं सांगण्यात येत होतं. या प्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com