Unemployment Rate in India | कोरोनाचा फटका, डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर ४ महिन्यांच्या उच्चांकावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unemployment Rate in India

कोरोनाचा फटका, डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर ४ महिन्यांच्या उच्चांकावर

Unemployment Rate in India : देशात तसेच जगभरात कोरोना रुग्ण वाढत आहेत, त्यातच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट देखील वेगाने पसरत आहे. या दरम्यान डिसेंबरमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर (Indias Unemployment Rate) चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (Centre for Monitoring Indian Economy ) च्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron Variant) जबाबदार असल्याचे मानले जात आहे.

या संदर्भात जारी केलेल्या रीपोर्टमध्ये म्हटले आहे की अनेक राज्यांमध्ये ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर देशातील आर्थिक व्यवहार आणि ग्राहकांची मानसीकता प्रभावित झाली आहे.

बेरोजगारीचा दर ७.९ टक्क्यांवर

आज जाहीर झालेल्या CMII रिपोर्टनुसार, डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर वाढून ७.९ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो नोव्हेंबरमध्ये ७.९ टक्के होता, हा ऑगस्टमधील ८.३ टक्क्यांनंतरचा हा उच्चांक आहे. विशेष म्हणजे, मे 2021 मध्ये भारतात सर्वाधिक बेरोजगारीचा दर नोंदवला गेला. या महिन्यात तो 11.84 टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. मुंबईस्थित CMIE कडून बेरोजगारीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते, कारण सरकारकडून मासिक आकडेवारी जाहीर केली जात नाही.

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रभाव

डिसेंबरमध्ये शहरी बेरोजगारीचा दर मागील महिन्यातील ८.२ टक्क्यांवरून ९.३ टक्क्यांवर पोहोचला, असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीवरून दिसून येते. याशिवाय, ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर ६.४ टक्क्यांवरून ७.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. CMIE च्या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, Omicron प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर आर्थिक कामकाज आणि ग्राहकांच्या मनस्थितीवर परिणाम झाला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirus
loading image
go to top