esakal | नोकरदारांनो, तुमच्यासाठी आहे ही चिंताजनक बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

Job Lost.

स्विगीकडून 350 कर्मचारी कपात

- इंडिगोचीही कर्मचारी कपात 

नोकरदारांनो, तुमच्यासाठी आहे ही चिंताजनक बातमी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचे मोठे संकट आहे. या संकटामुळे अमेरिका, ब्राझील, भारतासह अनेक देशांना याचा फटका बसला आहे. हॉस्पिटॅलिटी, फिटनेसपासून ते एव्हिएशन इंडस्ट्रीपर्यंत अनेक क्षेत्रात नोकऱ्यांचे स्वरूप बदलत आहे. ही परिस्थिती केव्हा बदलेल याचा कोणाला अंदाज नसताना आता नवी माहिती समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जगभरात कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गुणाकारात वाढत आहे. त्यानंतर आता देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. तसेच आजही अनेक ठिकाणी थोड्याफार प्रमाणात लॉकडाऊन सुरुच आहे. त्यामुळे कमकुवत आर्थिक वाटचाल आणि इतर कारणास्तव उद्योग-धंदे काही प्रमाणात बंद आहेत. त्यानंतर आता कर्मचारी कपात आणि पगार कपातीची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. 

स्विगीकडून 350 कर्मचारी कपात

फूड डिलिव्हरी कंपनी असलेल्या स्विगीनेही आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने 350 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. तर मे महिन्यातही 1100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. 

कोरोना व्हायरसमुळे मोठा फटका

फूड डिलिव्हरी आणि रेस्टॉरंट या सेवाक्षेत्रांना लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका बसला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांनी दुकाने बंद केली आहेत. या व्यवसायात असलेल्या चालक-मालकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जात आहे. तरीदेखील याचा फटका बसत आहे. 

इंडिगोचीही कर्मचारी कपात 

जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. या व्हायरसचा संसर्ग रोखता यावा, यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केला. त्यानंतर अनेक उद्योग-धंद्यांना याचा मोठा फटका बसला. पण आता इंडिगो (Indigo) या विमान कंपनी तोट्यात जात आहे. त्यामुळे या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. 

अनेकांना भविष्याची चिंता

भारतासह जगभरात कोरोनाचे मोठे संकट आहे. या संकटामुळे अनेकांना आपल्या उद्योग-धंद्याची चिंता आहे. त्यानंतर आता भारतात पुन्हा एकदा कर्मचारी आणि पगार कपातीची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image