हवाई दलाची क्षमता वाढणार; रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी करार

वृत्तसंस्था
रविवार, 30 जून 2019

- भारताने रशियासोबत रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी 200 कोटी रुपयांचा केला करार.

- या करारानंतर भारतीय हवाई दलाची क्षमता वाढणार आहे.

नवी दिल्ली : भारताने रशियासोबत रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी 200 कोटी रुपयांचा करार केला. या करारानंतर भारतीय हवाई दलाची क्षमता वाढणार आहे. या करारानुसार आणीबाणीच्या परिस्थितीसाठी आपल्या एमआय-35 या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी रशियाकडून ही रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे (स्ट्रम अटाका) खरेदी केली जाणार आहेत.

भारताला येत्या तीन महिन्यांत या क्षेपणास्त्रांचा पुरवठा सुरु होणार आहे. 'स्ट्रम अटाका' हे क्षेपणास्त्र एसआय-35 हेलिकॉप्टरमध्ये लावल्यानंतर शत्रूचे रणगाडे आणि इतर शस्त्रांपासून वाचण्याची क्षमता वाढणार आहे. एमआय-35 भारतीय हवाई दलाचे थेट हल्ला करणारे हेलिकॉप्टर आहे. भारत अनेक काळापासून रशियाकडून क्षेपणास्त्र खरेदी करण्यास उस्तुक होता. मात्र, या कराराच्या माध्यमातून तब्बल एक दशकानंतर भारताची रशियासोबतच्या कराराची इच्छा पूर्ण झाली. 

दरम्यान, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तिन्ही दलांना आपात्कालीन अधिकार दिले आहेत. या अधिकारानुसार, सैन्य दलांना 300 कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे तत्काळ खरेदी करता येऊ शकतात. त्यानुसार हा करार झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Signs Rs 200 Crore Anti Tank Missile Deal with Russia