Protest News: एसआयआर’ रद्द करा, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या; दिल्लीतील आंदोलनात आंदोलकांच्या जोरदार घोषणा

Gyanesh Kumar Resignation : मतदारयाद्यांच्या सखोल पडताळणी मोहिमेला (एसआयआर) विरोध करत डावे पक्ष आणि विविध संघटनांनी नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.
Protesters opposing the Special Intensive Revision of electoral rolls attempt to march towards the Election Commission of India office in New Delhi.

Protesters opposing the Special Intensive Revision of electoral rolls attempt to march towards the Election Commission of India office in New Delhi.

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : मतदारयाद्यांच्या सखोल पडताळणी मोहिमेला (एसआयआर) विरोध करत डाव्या पक्षांसह विविध संघटनांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. गोल डाकखाना येथून सुरू झालेला मोर्चा आयोगापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी शंभरपेक्षा जास्त आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com