शाश्वत विकासात स्थान घसरले; नेपाळ, भूटानही भारताच्या पुढे

देशांतर्गत विचार करता, शाश्‍वत विकासाची उद्दीष्ट्ये पूर्ण करण्यात बिहार आणि झारखंड सर्वांत मागे असून केरळ, हिमाचल प्रदेश आणि चंडीगड ही राज्ये/केंद्रशासित प्रदेश आघाडीवर आहेत.
Prakash Javadekar
Prakash Javadekar File photo
Summary

देशांतर्गत विचार करता, शाश्‍वत विकासाची उद्दीष्ट्ये पूर्ण करण्यात बिहार आणि झारखंड सर्वांत मागे असून केरळ, हिमाचल प्रदेश आणि चंडीगड ही राज्ये/केंद्रशासित प्रदेश आघाडीवर आहेत.

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांनी २०१५ मध्ये ठरविलेली शाश्‍वत विकासाची उद्दीष्ट्ये (SDG) गाठण्यात भारताचा वेग कमी पडत असून या यादीत गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताचे स्थान दोन अंकांनी घसरले आहे. सध्या १९३ देशांच्या यादीत भारताचे स्थान ११७ क्रमांकावर आहे. भारताचा पर्यावरण अहवाल २०२१ प्रसिद्ध झाला आहे. यानुसार, भारताचे स्थान दोन क्रमांकांनी घसरले आहे. भूक आणि अन्न सुरक्षा (एसडीजी २), लिंग समानता (एसडीजी ५) आणि दर्जेदार पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक औद्योगिकीकरण आणि संशोधन (एसडीजी ९) ही उद्दीष्ट्ये साध्य करण्यात भारताला फारसे यश न आल्याने स्थान घसरल्याचे अहवालात म्हटले आहे. एकूण १०० पैकी भारताचे ६१.९ गुणांक आहेत. (India slips two spots to rank 117 on 17 sustainable development goals)

भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या चार आशियाई देशांचे स्थान भारताच्या आधी आहे. देशांतर्गत विचार करता, शाश्‍वत विकासाची उद्दीष्ट्ये पूर्ण करण्यात बिहार आणि झारखंड सर्वांत मागे असून केरळ, हिमाचल प्रदेश आणि चंडीगड ही राज्ये/केंद्रशासित प्रदेश आघाडीवर आहेत. याबाबतचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते.

संयुक्त राष्ट्रांनी सर्व सदस्य देशांना २०३० पर्यंत साध्य करण्यासाठी काही निश्‍चित उद्दीष्ट्ये दिली आहेत. जगभरातील सर्व देशांमधील नागरिकांना शांतता आणि समृद्धी मिळवून देणे, हा या मागील उद्देश आहे. विकसीत असो वा विकसनशील, सर्वच देशांनी ही १७ उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.

Prakash Javadekar
"शिवरायांचं नौदल धोरण देशाला आजही दिशादर्शक"

ही आहेत १७ उद्दिष्ट्ये

१. गरीबी निर्मूलन, २. भूकेची समस्या मिटविणे, ३. चांगले आरोग्य, ४. दर्जेदार शिक्षण, ५. लिंग समानता, ६. शुद्ध पाण्याची उपलब्धता आणि सांडपाण्याची व्यवस्था, ७. शुद्ध ऊर्जा, ८. आर्थिक विकास आणि रोजगार, ९. उद्योग, संशोधन आणि पायाभूत विकास, १०. असामनता कमी करणे, ११. शहरांचा शाश्‍वत विकास, १२. स्रोतांचा योग्य वापर आणि उत्पादन, १३. पर्यावरण सुधारणा, १४. जलजीवनाचे संवर्धन, १५. जमीनीवरील जीवांचे संरक्षण, १६. शांतता, न्याय आणि सशक्त संस्था आणि १७. उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी सक्षम जागतिक भागीदारी

Prakash Javadekar
भारतातून पळून आलो नाही; चोक्सीनं सांगितलं देश सोडण्याचं कारण

पर्यावरण निर्देशांकातही खालचा क्रमांक

पर्यावरण संरक्षणाबाबतच्या निर्देशांकातही १८० देशांमध्ये भारताचा १६८ वा क्रमांक आहे. पर्यावरणाची स्थिती, वातावरण, हवेचे प्रदूषण, सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, जैवविविधता या मुद्द्यांवर क्रमवारी ठरविली जाते. एखादा देश पर्यावरणाच्या संरक्षणासाठी किती सजग आहे आणि त्याचे किती चांगल्या प्रकारे रक्षण करतो, तसेच नैसर्गिक आपत्तींपासून आपल्या नागरिकांचा कसा बचाव करतो, याकडेही संयुक्त राष्ट्रांचे लक्ष असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com