esakal | "शिवरायांचं नौदल धोरण देशाला आजही दिशादर्शक"
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Navy_Shivaji Maharaj

"शिवरायांचं नौदल धोरण देशाला आजही दिशादर्शक"

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांचं नौदल धोरण (Naval Policy) आजही देशाला दिशादर्शक असल्याचं, मत एअर मार्शल अजित भोसले (Ajit Bhosale) यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीनं आयोजित महाराष्ट्र हिरक महोत्सव व्याख्यानमालेत भोसले बोलत होते. राज्य शासन शिवराज्याभिषेक दिन ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करत आहे, या दिनाचं औचित्य साधून हे व्याख्यान आयोजित केलं होतं. (Shivaji Maharajas naval policy still guides the country says Air Marshal Ajit Bhosale)

हेही वाचा: जम्मू-काश्मीर : पुलवामात पोलिसांवर दहशतवादी हल्ला; सात जखमी

यावेळी बोलताना एअर मार्शल भोसले म्हणाले, "मध्ययुगीन काळातील घडामोंडीचा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांना कळून चुकलं होतं की, ज्यांचं समुद्रात अधिपत्य स्थापित राहील तेच जमीनवरदेखील राज्य करू शकतात. त्यामुळे महाराजांनी तत्त्कालीन परिस्थितीमध्ये नौदलाकडं विशेष लक्ष देऊन सामुद्रिक धोरण सशक्त केलं. त्याचा खूप मोठा सकारात्मक प्रभाव त्याकाळात पाहायला मिळाला. तसेच स्वतंत्र भारताचा नौदलाचा पाया हा शिवाजी महाराजांमुळेच अधिक सशक्तपणे रचला गेला.

भारतीय नौदलाच्या जुन्या परंपरा

नौदलाच्या पंरपरा जुन्या असल्याचा उल्लेख करत भोसले म्हणाले, "मौर्य, गुप्त, चालुक्य, चोल, पल्लव काळात सशक्त नौदल होतं. या राज्यकर्त्यांनी समुद्रमार्गे सांस्कृतीक आणि राजकीय मोहिमा राबविल्या. याचे पुरावे जावा, सुमात्रा, ब्रम्हदेश, इंडोनशिया, मलाया, थांडलँड आदी देशात दिसतात. प्राचीन काळातील भक्कम असलेली नौदल पंरपरा मध्ययुगीन काळात रसातळाला पोहोचली होती. त्याला अनेक कारणं होती. याचा फायदा युरोपीयन वसाहतवादांनी घेतला. वास्को-द-गामाच्या समुद्रमार्ग शोधानंतर इंग्रज, पोर्तुगीज आणि इतर वसाहतवादी राष्ट्रे व्यापाऱ्याच्या हेतूने भारतात दाखल झाले."

हेही वाचा: ९३ माजी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र; लक्षद्वीपबाबत व्यक्त केली चिंता

स्वराज्यात ८५ जहाजं होती

मध्ययुगीन काळातील सुजाण राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतूनच नौदलं उभं राहिलं. मराठा साम्राज्याला त्यामुळे बळकटी मिळाली. 17 व्या शतकाच्या मध्यापर्यंत नौदलाविषयक मराठ्यांची ताकद कमी होती. पश्चिम घाट, कोकण किनारपट्टीवर सिद्दीची पकड होती. त्यांच्याकडे मजबूत बोटी होत्या. यासह इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांचेही सामारिक पकड मजबूत होती. शिवाजी महाराजांना जाणीव होती की, जोपर्यंत समुद्रावर नियंत्रण होत नाही तोपर्यंत स्वराज्याचं स्वप्न साकार होऊ शकत नाही. यासाठी त्यांनी ४ सामुद्रीक उद्देश ठेवले. यातील पहिला उद्देश कोकण किनारपट्टीची सिद्द व युरोपीयन लोकांपासून सुरक्षा, स्वराज्य स्थापनेत उपद्रव निर्माण करणा-या परकियांना थांबविणं, कोकण किनारपट्टीवरून होणाऱ्‍या व्यापार मार्गावरील आवक-जावकावर नियंत्रण करणे, मित्र राज्यांची समुद्रमार्गे होणारी लूट थांबविणं. हे चार उद्देश ठरवून नौदलाकडं लक्ष वळविलं. याचा सकारात्मक परिणाम झाला. 1659-65 या दरम्यान शिवाजी महाराजांनी एकूण 85 जहाजं निर्माण केली. यामध्ये तीन मोठी जहाजं होती पुढे हे आरमार वाढत गेलं. पुढे या आरमारीचे दोन प्रमुख सुभे (केंद्र) झाले आणि त्यांचे प्रमुख सुभेदार म्हणून ओळखले जाऊ लागले, असं सांगताना एअर मार्शल भोसले यांनी मल्हाराराव चिटणीस यांनी शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या चरित्राचा दाखला दिला.

हेही वाचा: लडाखमध्ये भीषण थंडी; चिनी सैनिक गारठले, भारतीय जवानांचा खडा पहारा!

सर्वसमावेशक राष्ट्रीय शक्ती ही महत्वाकांक्षा

भारतीय इतिहासात चोल साम्राज्यानंतर शिवाजी महाराजांनीच राजकीय हेतूनं आरमार उभं केलं. जेणेकरून स्वराज्याची स्थापना तसेच समुद्रावर अधिपत्य होऊ शकेल. स्वराज्य निर्मितीत शिवाजी महाराजांची महत्त्वाकांक्षा ही एक सर्वसमावेशक राष्ट्रीय शक्ती बनविण्यासाठी होती. आरामार हे त्यासाठी अत्यावश्यक असून त्याची जाण बाळगूण माणसं संघटीत केली, तंत्रज्ञान आत्मसात केलं आणि एका नवीन सामुद्रिक लष्करी पंरपरेला जन्म दिला. याच पायावर एक शक्तीशाली आरमार सरखेल कान्होजी आंग्रेच्या नेतृत्वात उभं राहिलं.

loading image
go to top