
Soybean Production Drop
sakal
इंदूर : सोयाबीनचे उत्पादन या वर्षी देशात सुमारे २०.५ लाख टनांनी घटणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीनचे उत्पादन १०५.३६ लाख टनांवर येण्याची शक्यता असल्याचे भारतीय सोयाबीन प्रक्रिया संघटनेने (सोपा) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे.