अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी संख्येत घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी संख्येत घट

अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी संख्येत घट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना संसर्गस्थितीचा परिणाम शिक्षणावरही झाला असून गेल्या शैक्षणिक वर्षीच्या तुलनेत यावर्षी अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १३ टक्क्यांनी घट झाली आहे. अर्थात, संख्येत घट होऊनही इतर देशांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी अमेरिकेलाच सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून आले आहे.

‘इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टुडंट्‌स’ या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोना संसर्गस्थितीमुळे आलेल्या विविध अडचणींचा परिणाम म्हणून अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे या अहवालात म्हटले आहे. मात्र, ही संख्या पुन्हा वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. या वर्षीच्या एप्रिल आणि मे महिन्यांत ६२ हजार विद्यार्थी व्हिसा दिल्याचे आणि ही संख्या इतर कोणत्याही वर्षापेक्षा अधिक असल्याचे दिल्लीतील अमेरिकी दूतावासाने सांगितले.

हेही वाचा: बुलडाणा : तलाठ्यास लोटपोट करून गाडी खाली घेण्याची धमकी

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती अद्याप अमेरिकेलाच असून त्यातही अमेरिकेतील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये चीननंतर भारतीय विद्यार्थ्यांचाच क्रमांक लागतो.

कोरोना संसर्गस्थिती हेच भारतीय विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्याचे एकमेव कारण असल्याचे अमेरिकी दूतावासातील शैक्षणिक सल्लागार अँथनी मिरांडा यांनी सांगितले. ‘कोरोना परिस्थितीमुळे प्रवासावर अनेक निर्बंध आल्याने भारतातून अनेक विद्यार्थी अमेरिकेत जाऊ शकले नाही. अमेरिकेतही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे,’ अशी माहिती मिरांडा यांनी दिली. भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १३ टक्क्यांनी घटली आहे तर, एकूणात अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १५ टक्क्यांनी घट झाली आहे.

अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संख्या (२०२०-२१)

९,१४,000

एकूण विद्यार्थी

१,६७,५८२

भारतीय विद्यार्थी

loading image
go to top