
Bhargavaastra Successfully tested : भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या S400 या एअर डिफेन्स सिस्टिमनं आपली ताकद दाखवून दिली आहे. पाकिस्तानकडून डागणायात आलेली अनेक ड्रेन्स या सिस्टिमनं हवेतच निकामी केली. पण आता भारत अशा ड्रोन्सच्या हल्ल्यांपासून बचावाबाबत अधिक सक्षम होणार आहे. कारण एकाच वेळी अनेक ड्रोन्सचे हल्ले परतवून लावण्यासाठी भारतानं 'भार्गवास्त्र' ही काऊंटर ड्रोन सिस्टिम विकसित केली आहे.