
भारत जगाला अन्नधान्य पुरवेल
अहमदाबाद : जागतिक व्यापार संघटनेने (डब्लूटीओ) परवानगी दिल्यास भारत जगातील अन्य देशांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यास तयार असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या सोमवारी व्हर्च्युअली संवाद साधताना मोदींनी भारताची भूमिका स्पष्ट केली. युक्रेन युद्धामुळे जगातील अनेक देशांमध्ये अन्नधान्याची टंचाई जाणवू लागली असल्याने भारताने त्यांना मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज येथील एका शिक्षण संस्थेतील मुलांसाठीचे वसतिगृह आणि शैक्षणिक संकुलाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी बोलताना त्यांनी ही गोष्ट बोलून दाखविली.
मोदी म्हणाले की, ‘‘ कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून म्हणजेच मागील दोन वर्षांपासून भारत देशातील ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देत असल्याचे पाहून जग अवाक् झाले आहे. सध्या जग हे एका मोठ्या अनिश्चिततेला सामोरे जात असून प्रत्येक देशाला गरजेची असलेली कोणतीही वस्तू मिळताना दिसत नाही. सगळ्यांनीच आपआपली दारे बंद केल्याने पेट्रोल आणि खते देखील मिळणे मुश्कील झाले आहे. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून प्रत्येक देश अन्नधान्याचा साठा करून ठेवू लागला आहे. ज्या देशांनी साठेबाजी केली त्यांना नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडील अन्नधान्य संपत चालले आहे. बायडेन यांच्याशी चर्चा करताना त्यांनी देखील हीच बाब बोलून दाखविली.
Web Title: India Supply Food Grains World Prime Minister Modi Role Before Us President Biden
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..