
नवी दिल्ली : भारताची व्यापार कराराच्या अनुषंगाने अमेरिकेसोबतची बोलणी आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोचली असून कृषी उत्पादनांच्याबाबतीत केंद्र सरकारने ठाम भूमिका घेत कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या वाणिज्य विभागाचे विशेष सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील भारताचे पथक अमेरिकेमध्ये असून ते व्यापार कराराच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चर्चेमध्ये सहभागी झाले आहे.