
श्रीनगर : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचे कंबरडे मोडले होते. एकीकडे सीमेवरती दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असताना पाकिस्तानकडून अमृतसरमधील सुवर्णमंदिरास लक्ष्य करून एक क्षेपणास्त्र डागण्यात आले होते पण भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने ते हवेमध्ये निष्प्रभ केले. संबंधित क्षेपणास्त्र आणि मंदिराच्या दिशेने येऊ पाहणाऱ्या ड्रोनच्या ढिगाऱ्याचे छायाचित्र लष्कराकडून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.