
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून दहशतवादाला सातत्याने मिळणारे खतपाणी अन् आंतरराष्ट्रीय निधीचा शस्त्रसाठ्यासाठी होणारा गैरवापर याची सविस्तर माहिती भारत लवकरच आर्थिक कारवाई कृती दल (फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स-एफएटीएफ) या जागतिक आर्थिक गैरव्यवहार अन् गुन्हे प्रतिबंधक संस्थेकडे सादर करणार आहे. यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याची शिफारस भारताकडून होणार आहे. जागतिक बँकेकडून पाकिस्तानला होणारा निधीचा पुरवठाही रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.