अनलॉक 3: देशांतर्गत प्रवासाचे नियम कसे असतील जाणून घ्या

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

1 ऑगस्टपासून भारत अनलॉक 3 मध्ये प्रवेश करत आहे. अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात भारत सरकारने अनेक निर्बंध उठवले आहेत.

नवी दिल्ली- 1 ऑगस्टपासून भारत अनलॉक 3 मध्ये प्रवेश करत आहे. अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात भारत सरकारने अनेक निर्बंध उठवले आहेत. सरकारने अनलॉक तीनचे मार्गदर्शन तत्वे याआधीच जाहीर केले आहेत. शिवाय प्रवासावरील निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, देशभरात रात्रीची संचारबंदी उठवण्यात आली असून देशांतर्गत प्रवासालाही परवानगी देण्यात आली आहे. 

PM मोदींच्या पावलावर पाउल टाकत आता ट्रम्पही देणार चीनला दणका

भारत सरकारने निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला असला तरी याबाबतचा अंतिम अधिकार राज्य सरकारांना देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेऊन राज्य त्यानुसार निर्णय घेऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्य सरकारानी टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला असून 31 ऑगस्टपर्यंत आंतरराज्यीय प्रवासावर निर्बंध असणार आहेत. 

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 ऑगस्टपर्यंत टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी सरकार येत्या काही दिवसात काही निर्बंध शिथिल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तोपर्यंत तरी आंतरराज्यीय प्रवासासाठी पास काढणे अनिवार्य आहे. 

तामीळनाडू सरकारने 31 ऑगस्टपर्यंत टाळेबंदी लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारने राज्यातून दुसऱ्या राज्यातील प्रवासावर निर्बंध आणले आहेत. मात्र, वैध पास काढून राज्याची सीमा पार करता येणार आहे.  

देशावर ‘पर्जन्यमाया’ कायम; मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात १०४ टक्के पावसाचा अंदाज

पश्चिम बंगाल सरकारने 7 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 24 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट रोजी कडकडीत टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने अनावश्यक गोष्टींसाठी खासजी वाहनांच्या वापरावर पूर्णपणे बंदी आणली आहे. कडक टाळेबंदीच्या काळात राज्याच्या सीमाही पूर्णपणे बंद असणार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे वैध ई-पास आहे अशाच लोकांना राज्याची सीमा ओलांडता येणार आहेत. 

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बिहार, आसाम आणि छतीसगड या राज्यांनी अनुक्रमे 16 ऑगस्ट, 15 ऑगस्ट आणि 6 ऑगस्टपर्यंत टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नागालँडमध्ये 31 ऑगस्टपर्यंत टाळेबंदी असणार आहे. त्यामुळे या राज्यातील आंतराज्यीय प्रवासावर निर्बंध असणार आहेत. 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India unlock 3 guidelines Interstate travel rules in the country