भारत-अमेरिकेत 'BECA'सह पाच करार, चीनला गलवानवरुन दिला इशारा

two plus two ind vs US
two plus two ind vs US

नवी दिल्ली - भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये मंगळवारी टू प्लस टू चर्चा झाली. यात दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री भेटले. या बैठकीमध्ये भारत-अमेरिका यांच्यात ऐतिहासिक अशा Basic Exchange and Cooperation Agreement (BECA) करार झाला.  बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. तसंच दोन्ही देशांनी भारताचा शेजारी देश चीनला गलवानवरून इशारा दिला आहे.

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, भारत आणि अमेरिकेचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ होत आहेत. टू प्लस टू बैठकीत दोन्ही देशांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ज्यामध्ये कोरोनानंतरची स्थिती, जगातील सद्यपरिस्थिती, सुरक्षेच्या अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. दोन्ही देशांनी अणु सहकार्य वाढवण्यासाठी पावले टाकली आहेत. तसंच भारतीय उपखंडात सुरक्षेबद्दलही चर्चा झाली. 

अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी म्हटलं की, सध्याच्या परिस्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री फक्त आशियाच नाही तर जगासाठी महत्वाची आहे. चीनकडून जगाला धोका वाढत आहेत. अशावेळी जगातील मोठ्या देशांनी एकत्र यायला हवं. भारत, जपान आणि अमेरिका सोबत अनेक लष्करी ऑपरेशन्स करू. मालाबार एक्ससाइजसुद्धा करण्यात येईल. याशिवाय दोन्ही देश एकमेकांसोबत डिफेन्श इन्फर्मेशन शेअरिंगमध्ये नव्या पातळीवर पोहचत आहोत.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कोरोना व्हायरसवरून चीनवर निशाणा साधला. चीनने पसरवलेल्या कोरोनाचा परिणाम जगाने पाहिला आङे. चीनची कम्युनिस्ट पार्टी सातत्याने वेगवेगळ्या कुरापती काढून जगाला भीती दाखवण्याचं काम करत आहे. मात्र भारत आणि चीन फक्त अमेरिकाच नाही तर इतर सर्व आघाड्यांवर एकत्र लढण्यासाठी तयार आहे. 

भारत आणि अमेरिका यांच्यात झालेले पाच करार
1.  Basic Exchange and Cooperation Agreement (BECA) 
2. MoU for technical cooperation on earth sciences
3. Arrangement extending the arrangement on nuclear cooperation 
4. Agreement on postal services
5. Agreement on cooperation in Ayurveda and Cancer research

काय आहे BECA करार ?
भारत आणि अमेरिका यांच्या टू प्लस टू चर्चेत एकूण पाच करार झाले. त्यापैकी BECA करार जास्त चर्चेत आहे. बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अॅग्रीमेंट (बेका) या करारामुळे मिसाइल हल्ला करण्यासाठी अमेरिकेची मोठी मदत मिळणार आहे. यामध्ये अमेरिकेचा विशेष डेटा भारताला वापरता येणार आहे. यामध्ये कोणत्याही भागाचे भौगोलिक स्थान अचूक असेल. बेका करार हा अमेरिकेचा भारतासोबतचा चौथा आणि अंतिम मूलभूत करार आहे. हा करार माहितीची देवाण-घेवाण करण्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com