

Finance Minister Nirmala Sitharaman
esakal
भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या वाटाघाटी एका निर्णायक आणि स्थिर टप्प्यावर पोहोचल्या आहेत. येथून पुढे दोन्ही बाजूंना अधिक सवलती देणे किंवा घेणे अत्यंत कठीण ठरणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.