भारत व्हिएतनाममध्ये मोठा करार; चीनला झोंबल्या मिरच्या

अमेरिका, फ्रान्स आणि रशियानंतर भारताने व्हिएतनामशी लॉजिस्टिक करार केला आहे.
Rajnath Singh
Rajnath Singh sakal

नवी दिल्ली : अमेरिका, फ्रान्स आणि रशियानंतर भारताने व्हिएतनामशी (Vietnam लॉजिस्टिक करार केला आहे. या करारानुसार दोन्ही देशांच्या युद्धनौका, विमाने आदी एकमेकांच्या युद्धतळाचा वापर करू शकणार आहे. भारताचा चीनसोबत LAC वाद आहे, तर व्हिएतनामचाही चीनसोबत सागरी सीमांबाबत वाद असून, दोन्ही देशांचे चीनशी युद्ध झाले आहे. त्यात हा करार झाल्याने चीनला चांगल्याच मिर्च्या झोंबल्या आहेत. (India Vietnam Agreement)

व्हिएतनामने प्रथमच असा करार केला आहे

व्हिएतनामने प्रथमच कोणत्याही देशासोबत लॉजिस्टिक सपोर्टबाबत करार केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि व्हिएतनामी जनरल फान व्हॅन गिआंग यांनी या लॉजिस्टिक करारावर स्वाक्षरी केली आहे. भारत आणि व्हिएतनाममध्ये समकालीन काळातील सर्वात विश्वासार्ह संबंध आहेत ज्यात व्यापक हितसंबंध आणि समान चिंता असल्याचे मत संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

द्विपक्षीय संरक्षण संबंध, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांना पुढे नेण्यासाठी प्रभावी आणि व्यावहारिक पुढाकारांवर दोन्ही देशातील नेत्यांमध्ये व्यापक चर्चा झाल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आम्ही '2030 च्या दिशेने भारत-व्हिएतनाम संरक्षण भागीदारी'वर संयुक्त व्हिजन स्टेटमेंटवर स्वाक्षरी केली आहे. ज्यामुळे संरक्षण सहकाऱ्याची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढण्यास मदत होणार आहे.

हा करार महत्त्वाचा का आहे?

हा करार महत्त्वपूर्ण आहे कारण यामुळे भारतीय युद्धनौका आणि लष्करी विमानांना व्हिएतनामी तळांवर इंधन भरण्याची आणि पुरवठा करण्याची परवानगी मिळणार आहे. दोन्ही देशांच्या युद्धनौका, विमाने आदी एकमेकांच्या तळावर थांबू शकणार आहे. व्हिएतनाम हा दक्षिण चीन समुद्राच्या प्रादेशिक सीमांकनावरून चीनशी वादात सापडलेल्या सहा देशांपैकी एक आहे. तर भारताचेदेखील चीनसोबत सीमावाद सुरू आहेत. या सर्व घडामोडींमध्ये भारत आणि व्हिएचनाममध्ये करार झाल्याने चीनला जोरदार मिरच्या झोंबल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com