India vs Pakistan Asia Cup : 'आशिया कप'मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणे भारताची मजबूरी का आहे? माजी क्रीडामंत्र्यांनीच सांगितलं नेमकं कारण

Why India Cannot Avoid Playing Pakistan : भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षांनी तर हा मुद्दा उचलून धरत केंद्रातील मोदी सरकारवर टीकाही सुरू केली आहे.
Former Sports Minister Anurag Thakur explains why India must face Pakistan in the Asia Cup despite political tensions.

Former Sports Minister Anurag Thakur explains why India must face Pakistan in the Asia Cup despite political tensions.

esakal

Updated on

Anurag Thakur’s Statement on Asia Cup 2025: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा ताणले गेलेले आहेत. भारतीयांच्या मनात पाकिस्तानबद्दल प्रचंड संताप आहे, शिवाय भारताने या भ्याड दहशतवादी ह्ल्ल्याचेही चोख प्रत्युत्तर दिलेले आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला पोसणं बंद करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी कुठलेही संबंध न ठेवण्याची भारताची भूमिका आहे. मात्र तरीही सध्या सुरू असलेल्या आशिया कप क्रिकेट मालिकेत भारत आणि पाकिस्तान या दोन संघात सामना खेळला जाणार आहे.

खरंतर यावरून सध्या भारतातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षांनी तर हा मुद्दा उचलून धरत केंद्रातील मोदी सरकारवर टीकाही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आता माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी, भारताची पाकिस्तानसोबत आशिया कपमध्ये सामना खेळण्याची नेमकी कोणती मजबूरी आहे, हे सांगितले आहे.

२०२५ च्या आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. पण या सामन्याबद्दल लोकांमध्ये संतापही आहे, तर काही ठिकाणी निदर्शनेही होत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी क्रीडा मंत्री आणि विद्यमान भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले की आशियाई क्रिकेट परिषद (ACC) किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे आयोजित स्पर्धांमध्ये असे सामने टाळता येणार नाहीत.

Former Sports Minister Anurag Thakur explains why India must face Pakistan in the Asia Cup despite political tensions.
India Vs Pakistan match: भारत-पाकिस्तान मॅचसाठी मोदींवर ट्रम्प यांचा दबाव? ; केजरीवालांनी व्यक्त केली भीती!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२-१३ मध्ये झाली होती. तेव्हापासून, दोन्ही देशांमधील सामने केवळ आशिया कप, एकदिवसीय विश्वचषक आणि T20 विश्वचषक यासारख्या जागतिक किंवा खंडीय स्पर्धांपुरते मर्यादित आहेत.

Former Sports Minister Anurag Thakur explains why India must face Pakistan in the Asia Cup despite political tensions.
Nepal Interim PM Sushila Karki : नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांचे भारतातील ‘या’ प्रसिद्ध तीर्थक्षेत्राशी आहे खास नाते!

वृत्तसंस्था एएनआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ठाकूर म्हणाले, "जेव्हा एसीसी किंवा आयसीसी स्पर्धा असतात तेव्हा देशांना खेळणे बंधनकारक होते. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना स्पर्धा सोडावी लागेल किंवा सामना गमावावा लागेल आणि गुण दुसऱ्या संघाकडे जातील. परंतु भारत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळत नाही. आम्ही वर्षांपूर्वी निर्णय घेतला आहे की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत आम्ही द्विपक्षीय क्रिकेट खेळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com